Sunday 1 May 2011

अमरची...क्षमायाचना....


(माझी कबुली, हितगुज, तक्रार, विनवणी, प्रार्थन)



परीक्षेस बसवयची, नाही माझी रे लायकी,
तरी कां चाचपशी, नित्य मज तू गोविंदा....


अनेक वेळा दिसती खुणा, तुझीया अस्तित्वाच्या,
पदोपदी रक्षीसी सदा, नित्य तूच गोविंदा.


तुजला न दाखवीता नैवैद्य, मी भक्षी सदकदा,
ऐसा निर्लज्ज कोडगा मी, का बा झालो आई बाप्पा.


घ्यावी टोचून एकदा, तुझीया नामची गे ,
मग कैसी लागण आम्हा, भवरोग, चिंता किंवा आधी व्याधीची


घ्यावे नांव माउलीचे, मारावी भवसागरी उडी,
प्रत्यक्ष श्रीहरी, सोबतीला.


आकाशातुन पडे पाणी, धरतिला फुटे कोंब,
फुलांचा सुटे गंध,  डोळा येतसे आनंद अश्रू
हेची दान देगा आई, असो इतुके निर्मळ ते की,
घडो चरणाभिशेक तूला, त्याने माऊली नित्य.


धरावे ते पाय, माउली चे धृढ,
आनंदाचे डोही, आनंद तरंग . 

 

प्रवृत्ती विरली, निवृत्ती उरली,
द्न्यानियांचा राजा, वाटे पसायदान. 
म्हणोंन आलो तव दारी, न झालो ऋणी मी जन्मान्चा,
कसे फेडू पांग आता, वाटे न व्हावे उतराई कधीही आता.


आता सांगू काय, गुरुचरण महिमा,
किटाळ विरला, जानमोजन्मीचा. 

 

अंत:करणी माझिया, सदगुरू असावा,
हीच प्रार्थना देवा, तुझीया चरणापाशी 

 

कोणशी ठकावे, कोणाशी संभाळावे,
माउली सर्वत्र, सदा जाण. 

 

माउली चा ध्यास, माउली चा वसा,
देई पांडुरंगा, तुला तीची आण. 

 

होता येईल का मला, व्रुन्दावनातिल माती तरी,
बेळ्गाव शहरी, अनगोळ माळी न्यारी.

 

प्रारब्ध फळा आले, मसी जन्मासी घातले,
धावे सैरवैरा जीव पर, तुझीया पायी तो विसावे.

 

यशोदा होऊनिया त्याला, ऊखळी बांधावे आई,
मन माझे माऊलीगे, सारखे खोड्या करी.

 

पाण्याशी सोडिले मज, मासोळी करून,
पाणी न मी प्यावे माउली,  ऐसे कैसे.

 

मन असो द्यावे सदा, तव चरणी ते स्थिर ,
मग कशाची आबाळ, अंन गोंधळ तो हि कैसा.

 

फूल व्हावे, मोती व्हावे, गुम्फूनी गळा उतरावे,
पावा व्हावे, पीस व्हावे, माउली सवे सदा रहावे वाटे.


बालकाचे सारे खेळ, ओळ्खून असे माय,
तरी पुरवी ती लाड, कैसा होउ उतराई सांग.


ध्यानी मनी चित्ती एक, तरी चूका नित्य सत्य,
तरीही तू सांभाळीसी, कैसे फेडावे ते पांग.

 

युगे अठठावीस उभे केले, अवघे परबरम्ह,
पुंडलिकाचे उपकार, कैसे फेडावे आपण.

 

सुख:दुख: ही तो भावंडे, पाठशिवणी हा त्यांचा खेळ,
एकटे ना राही कधीही, एकटे ना जाय कुठे.
पण तुझीया पायी येता माय, दुख: सुख रूप होय,
क्षणभर ते ना थांबे, तिळ्भर ना ते उरे.
देव गंधर्व ही येती त्याचा, आनंद लुटाया तेथे पण,
पेंद्या, माद्या, गोपी शिवाय, तू कोणा कधीही ना देशी.
म्हणुन मागतो एकद बघा, पाडस बनवी गोकुळीच मज,
घास भरवी अमृताचा, नित्य तुझ्या सवे नांद मग.


विठू चे समचरण, कान्होबाचे ते देहूडा,
धेनू होऊन पाठ्ची तुझीया, चाटीन म्हणतो तव चरणा.



सोळा सहस्त्र नाड्या माझ्या,
असती तुझ्याच बायका.
चालवीशी, चाळ्वीशी, 
शांत करीशी तयाना,
तूच एक गोविंदा.


डोळे मिटावे, स्वस्थ बसावे,
हृदयी वृंदावन, रास होई गरभा खेळी,
खोड्या काढी गोविंद.


तुझाच अमर गे माये,
व्यक्त झलो तुझ्या सवे येथे.
चुकलो असल्यास कुठेही,
क्षमा करी मज हिच विनंती 
साश्रुनयने !




4 comments:

  1. I have rarely read such beautiful "Antariche hitguj". Touched my soul. Mala "antarmukh" kele. Ashok D Kothavle

    ReplyDelete
  2. अतिसुंदर...
    " अंतरीचा ठेवा उधळूनी मोकळा होवू पाहसी तू....
    परी अंतरी भगवंत साचलेला मोकळा कैसा होसी तू...."
    - शशांक

    ReplyDelete