Monday 2 May 2011

सांगा कि काय असते हे सगळ...????

काय असते हे सारे ?

कधीपासून पारावरच्या लोकांच्या चर्चा ऐकतोय...
काय समजेना...


शिक्षण....
आडमिशन... 
डोनेशन...
रिजर्वेशन...
वशिला...
पासपोर्ट...
व्हिसा....
प्रमोशन....
राजकारण....
समाजकारण...
देश...
धर्म...
जात...
पैसा...
प्रसिद्धी...
घर...
कपडे...
दागिने...
गाड्या...
इ. एम. आय.....
नशा...
खेळ...
औषधे...
पार्ट्या...
प्रसिद्धी...
युद्ध...
गुलामगिरी...
वगैरे वगैरे...?????
आणि बरेच काहीबाही...

काय असते हे सारे ?

सांगा कि काय असते हे सगळ...

सण...
वार...
उस्तव...
हुंडा...
दंगली...
जुगार...
कचरा...
भंगार...
खानदानी..
खंडणी...
काय असते हे सगळ...

छळ...
चोम्बडेपना... 
कुरघोडी...
इर्षा...
भाषा...
अहंकार...
द्वेष...
मत्सर...
सांगा कि काय असते हे सगळ...
बहुदा यामुळेच मनुष्य सर्वात सुधारलेला प्राणी असावा असे वाटतेय...
आणि 'संस्कार' कि काय म्हणत्यात...
ते पण जरा सांगाना आम्हाला...
परवा पासून पोराना सुट्टीत आमच्या कडे संस्कार वर्गांना किंवा 
शिबिराना पाठवा म्हणून एक जण जोरजोरात ओरडत पत्रिका वाटत हिंडतोय...
तेकाय फक्त १५ दिवसात होतात कि काय?


अन...नन्तर...हे लोक दिवाळीला फटके कि काय वाजवतात...
आमच्यातल्या काहीजनाची विणीचा हंगाम संपून नुकतीच बारीक बारीक पिल्लं झालेली असतात ...
ती त्या आवाजाच्या दणक्यानेच नुसती  मान टाकतात...
मग आम्ही दोघे एकमेकांकडे  बघत बसतो...

सांगा कि काय असते हे सगळ...

परवाच मी माझ्या पिल्लाला एक गोष्ट  सांगत होते...
चिउताइच घर होत गवताच्या काडीच...
आणि कावळ्याच झाडांच्या जड काडीच...
पण माणसान काय केल माहितीका?...

आकाशात सोडला धूर...
अन पाण्यात केमिकल...
जणू हि सारी पृथ्वी यांचीच हाय...

परवाच काही मुले बघितली...
नुकतीच जत्र वरण आली होती...
छानछान रंगीबेरंगी टोपी...
आणिवर लाल, गुलाबी, हिरवी पिवळी पिसं...
आपल्याच मस्तीत दंग होती सारी...
खेळत बागडत...
मजा वाटली...
जरा उडत उडत जाऊन जवळून बघितली...
पण ती पिसं पाहिली 
आणि मला माझ्या बाबांची आठवण आली...




नाय म्हणजे...
तुम्ही मजा करा...
प्रगती कि काय म्हणतात ते करा 
पण, त्यासाठी...

दया...
क्षमा...
शांती...
परोपकार...
मैत्री...
माणुसकी कि काय म्हणत्यात 
त्याला का द्यावी मूठमाती?


नाय म्हणजे तुमचा बाप तोच अमाचाबी बाप हाये...
म्हणून म्हणल...थोड फार आमच्या साठी शिल्लक ठेवाकीराव...
एव्हडच छोट मगन हाये...


कालच माजी पिल म्हणाली...
माणूस  दाखव कि माणूस, म्हणून...


घेऊन येउका त्याना उद्या तुमच्या कड...
बघा म्हजे...
सिकलीव्ह कि काय म्हणत्यात ती टाका...
मजा येईल...

आपला अमर,

No comments:

Post a Comment