Thursday 5 May 2011

माहिती आहेका तुम्हाला... तुमच्या आईचे आवडते फुल?



आज आपली ओंजळ अनेक मोती, माणिक आणि रत्नांनी भारी असेल
पण नीट बघितलेथ तर आईचा गळा मात्र रिकामा दिसेल...

तरीही तीच काढेल तुमची समजूत....
मलारे म्हातारीला काय उपयोग त्याचा ?
उलट आजकाल धोकाच आहे....

म्हणूनच...
तुम्ही कितीवेळा तुमच्या आईची ओंजळ फुलांनी भरलीय?
आणि तिने मनापासून तिचा भरभरून वास घेतलाय....

तिला दगिने नकोच असतात कारण तिला वाटत असते तुम्हीच तिचा दागिना आहात
पण काही दागिन्यांचे रुपांतर 'नगात' केव्हा होते ते लक्षात येत नाही....


तेव्हा...आपल्या ओंजळीतील मोती...एक एक गळायला लागायच्या आधी...
आईची ओंजळ फुलांनी भरा...

तिच्या डोळ्यातला मोगरा कोमेजण्याआधी 
आणि बकुळीच्या वेणीचे निर्माल्य होण्या आधी....
जमल्यास तेव्हडे तरी करा....

माहिती आहेका तुम्हाला तुमच्या आईचे आवडते फुल?
का फक्त बॉस चा वाढदिवस... आणि मित्रांच्या आवडीनिवडी?
आणि एखादी शालजोडीतला टोमणा मारणारी लई भारी?

माझ्या ओंजळीत अनेक मोती आहेत 
त्यांवर आई बरोबरच अनेकांची नावे आहेत...
मावशी, मामी, आत्या, काकू, बहिणी, मित्रपरिवार...

पण...तरीही मी तर आईचे लाटणे अजून जपून ठेवलय...
नुसते कोपर्यात बसून अभ्यास करतानाच्या आठवणी म्हणून नव्हे...
तर....अनेक तृप्त ढेकारांचे आवाज अजूनही त्यातून येत असतात म्हणून...


जेव्हा तिच्या सुर्कुतलेया हातांवरून हात फिरवाल...
तेव्हा लक्षात येईल तुमच्या गुळगुळीत धावपट्टीवरून धावणाऱ्या 
विमानामागाचे रहस्य....
ते काय रोल्स रोय्सच्या इंजिनावर थोडेच न धावत असते गड्यांनो...
त्याच्या मागे असते इंधन...
कष्टांचे, त्यागाचे, आपुलकीचे, प्रार्थनेचे,  आशीर्वादाचे...
आपल्या अनेक होशी दाबून ठेऊन जागेपणीच
बघितलेल्या तुमच्या उज्वल भविष्याचे...


आपला अमर...





4 comments:

  1. रडलो मी अमरजी ....आईची फार आठवण आली ..फार फार खस्ता खाल्ल्या तिने जाणीव आहे मला ..पण आज नाही ती माझ्यासोबत ...डोळे भरून आले आठवणीने ...गुलाब आवडायचे तिला ..आबोली सुद्धा ...कधी कधी हौसेने केवडाहि माळायची ,,,मोगरा ..चाफा ..फार हौसी होती माय माझी

    ReplyDelete
  2. हृद्य, हळुवार काव्य.जे जे सेवा करू शकले नसतील त्यांचा उर,डोळे भरून आणील.परमेश्वर अनेक मुखातून बोलतो.या कवितेत त्याने तुम्हाला माध्यम केले आहे.जो आई बापाकडे हेतुपुरुस्सर दुर्लक्ष करील अश्या दुर्दैवी औलादी च्या पाठीवर वळ उठविण्याची ताकद कवितेत आहे.'अमर' काव्य एवढेच म्हणता येईल.

    ReplyDelete
  3. भावनेच्या भरात तुम्ही जे लिहिलेय ते मनोगत आहे कविता नाही.चुकून कविता म्हणले गेले.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर!शब्दच अपुरे पडत आहेत कौतुक करायला!

    ReplyDelete