Monday 9 May 2011

प्रत्येकाच्यात दडलेले असतात...



प्रत्येकाच्यात दडलेले असतात एक 
राम...लक्षुमण...किंवा भरत आणि श्तृघ्न्ही....

प्रत्येकाच्यात दडलेले असतात एक 
रावण...कुंभकर्ण...बिभीषण किंवा इंद्रजीतही....

प्रत्येकाच्यात दडलेले असतात एक 
युदिष्टीर...पार्थ...भीम...किंवा नकुल आणि सहदेवही....

प्रत्येकाच्यात दडलेले असतात एक 
दुर्योधन...दुशासन...कर्ण....आणि शकुनीही....

तसेच...प्रत्येकाच्यात दडलेले असतात एक
दशरथ...जनक...धृतराष्ट्र...भीष्म आणि संजय् हि ....

आणि प्रत्येकात असते एक...
जानकी...मंथरा...शबरी  व कुंती...पांचाली 
आणि शिखंडीही... 


मग...

होतो कोणी श्रावणबाळ...आणि....
कोणी...अभिमन्यू अथवा अश्वथामा...
किंवा एकलव्य...

शेवटी कोण कोणावर वरचढ ठरतो...
त्यावर...ज्याचे त्याचे रामायण आणि ज्याचे त्याचे महाभारत...
मग आहेच  ज्याचा त्याचा वनवास...
अथवा ज्याचा त्याचा अज्ञातवास...
किंवा ज्याचा त्याचा अंगठा...

शेवटी हेच खरे कि...
सुटलेला बाण आणि शब्द... परत घेता येत नाहीत...
तेव्हा... शस्त्र वपरता येत नसतील 
तर त्यातून आपलाच घात निश्चित...

आणि म्हणूनच...

सर्वेपिः सुखिन संतुहू ...सर्वे सन्तु निरामयाः 
सर्वे भद्राणि पश्यन्तु...मां कश्चित दुखः माप्नुयात 


आपलाच अमर...

1 comment: