तत्वमसी... म्हणजेच..."त त्वं असी" म्हणजेच..तुझ्या मध्ये मी आहे आणि माझी मध्ये तू...हि शरणागतता जमण्यासाठी...मुळात अहंकार घालवावा लागतो...आणि संत व सिद्द अथवा ईश्वरी शक्ती त्या योग्य वाय्क्तींसाठी पहिले तेच करतात ...अदृश्य पणे..त्यांचा अह्न्काराराला ठेच पोहचवून सत्यतेची जाणीव करून देतात...आणि मग 'आस्था' वाटू लागते...वाढू लागते...आस्था पूर्वक कुठले हि कार्य केले कि ते तळमळीने...जाणीवेने होते...फक्त आपल्याला त्या पासून अलिप्त राहता येणे आवश्यक आहे...'इदन न मम'... नाहीतर परत आपणच फसत जातो...लोखंडाच्या बेडीतून...सोन्याच्या बेडीत...आणि संतांच्या म्हणण्यानुसार, एकवेळ लोखंडाच्या बेडीतून सुटका होणे सोप्पे...पण सोन्याच्या बेडीतून सुटका होणे जरा अवघडच...आणि म्हणूनच...'मी' पणातून...'शिव' पणात जाण्या साठी...'तत्वमसी' आणि 'इदन न मम' हे महत्वाचे...असे वाटते...तेव्हा...
आस्था पूर्वक चौकशी करणे,
आस्थेने विचारपूस करणे,
आस्थेने घरची अथवा बाहेरची कामे करणे,
आस्थेने मदत करणे, आस्थेने कुरुवाळणे,
आस्थेने रसास्वाद घेणे,
आस्थेने तपासणे,
आस्थेने समजूत काढणे,
आस्थेने समजावून सांगणे,
आस्थेने शिकून घेणे,
आस्थेने निरोप देणे,
आस्थेने प्रार्थना करणे...
अश्या अनेक गोष्टी दररोज क्षणाक्षणाला आपण करत असाव्यात...
कारण या सर्व गोष्टींतील 'आस्था' निघून गेली कि उरते ती फक्त 'अनास्था' आणि 'अनास्था' म्हणजेच कृत्रिमता
या अनास्थे मुळेच आजचे आपले जीवन आपण कृत्रिम तर बनवत नाहीहोत ना?...
आणि त्यामुळेच मग आपण इतके टोकाला जातो...
कि कधी कोणीतरी...याच 'आस्थेने' एखादी गोष्ट करतो...
आणि मग आपल्या मनात सहजच विचार येतो...
यात याचा काही 'स्वार्थ' तर नाही ना?...कितीभायानक गोष्ट आहे हि...
मला एक म्याकेनिक माहित होता...तो त्याच्या कडे येणाया गाड्यांशी बोलायचा, म्हणायचा "त्याशिवाय मला त्यांचे खरे दुक्ख कसे कळणार?... आणि मला हि कामाचे कष्ट जाणवत नाहीत मग" वगैरे वगैरे...तस्याच अनेक गोस्ष्टी पैकी म्हणजे...लहान पाणी मला कातीन्गाची फार भीती वाटायची...पण ते आजोबा...गोड गोड बोलत...एकदाच्या तिकडच्या चोकाश्या करत माझी कटिंग कधी व्यवस्थित करून टाकायचे कळायचे पण नाही, आणि वर घरी जाताना गोळी द्यायचे...तसेच एक मास्तर आमच्या इथल्या वाड्यात देवळात केदारेश्वराच्या दर्शनाला यायचे तेव्हा खिशात २/ ३ श्रीखंडाच्या गोळ्या असायच्या त्याचे आणिक बारीक तुकडे करून जाताजाता आम्हा मुलाना वाटायचे...आणि द्दीलीतले पान वाले पूवी गप्पा मारत मारत हळुवार पान लावायचे...वर म्हणायचे..."जल्दी मे किया तो रंग नाही लायेगा!"...त्यातील दर्शनाला येणारे मास्तर सोडले तर बाकीच्या व्यावसायिकांचे तेच तसेच आणि अधिक जोरात व्यवसाय चालू आहेत फक्त ते आता ती सर्व कामे...टि. व्ही. बघत बघत करतात...फक्त पंक्चर कादाणारा आण्णा तेव्हडा अजूनही आपल्याशी गप्पा मारत काम करत असतो...या आस्थे मुळे...मला त्या सर्वांची हि आठवण झाली...धन्यवाद !!!
khup chan!!!
ReplyDeletethanks Deeplai...keep visiting...keep giving feedbacks...bring your friends...follow me on this blog...thanks again
ReplyDeletecheers!
amar