Saturday, 30 April 2011

सिम्पली सचिन...



प्रिय सचिन,

एकच वेळा लाखो, करोड लोक सारे काही विसरून फक्त तुझ्या खेळत तल्लीन होतात
हि एक प्रकारची योगसाधनाच आहेकि रे, आणि हेही एक फार मोठे सामाजिक कार्यच आहे...

अश्या अनेकानेक करोडो देशी विदेशीच्या लोकाना त्यांचे...दुखः , आजार, दौर्बल्य, विकार 

अशा अनेक गोष्टी तू पुर्णपणे पणे विसरायला भाग पाडतोस...आणि अनेक वेळा अनेक जण
तुझ्यामध्ये स्वताला बघतात आणि आपली स्वप्ने साकार करतात म्हूनच तुला ते 

एकप्रकारचे देवत्व प्राप्त झालेले आहे ... नाहीका?

आणि त्यावर तुझी वरकडी म्हणजे तुझा नितांत साधे पणा, सच्चे पणा, डोक शांत ठेऊन पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती...

जी लोक २१ तास सध्या पाट्या टाकू शकणार नाहीत ते तुझ्यावर टीकेचा भडीमार केला तरीही तू फक्त तुझ्ज्यातल्या खेलाण्यानेच प्रतिउत्तर देणार आत्ता पर्यंत सर विव रिचर्डस च्या नाववर असणारा सर्वात जास्त वेळा जिंकलेला सामना अथवा मालिकावीर ह्या किताबा बाबतीत तू त्यान कधीच मागे टाकले...त्यांना ते मिळाले ते त्यांच्या मुले त्या कसोटी अथवा त्या मालिकेत विंडीज जिंकलेला असायचा म्हणून आणि तेच तुझ्या हि बाबतीत लागू होते...म्हणजेत बारातला आतापर्यंत सर्वात जास्त वेळा सामने अथवा मालिका सतत जिंकून देणारा तूच आहेस...

आता हेच बघ ना....

मार्च २०११ पर्यंत च्या २१ वर्षात तुझ्या कारकिर्दीतील...

आत्ता पर्यंत तुझ्या ५१ शतक सोहळ्या नुसार 
भारताने 
२० वेळा जिंकल्या 
१३ अनिर्णीत ठेऊ शकलो आणि फक्त 
११ हरलो...


तुझ्या 
४८ एकदिवसीय शातांमुळे 
३३ सामने आपण जिंकलो 
१३ हरलो आणि फक्त 
२ चे निकाल लागले नाहीत

तब्बल २१ वर्षे सतत एकच ध्यास घेऊन कुठलीही तमा न बाळगता
स्वत: बरोबरच इतराना सारे काही विसरायला लाऊन निव्वळ निखळ आनद देणारा
कुठलीही धोके, लबाडी, कुरघोडी अथवा वादविवाद, प्रसिद्धी किवा साध्या चर्चेतही
न गुंतता आणि निव्वळ आपले काम प्रामाणिक पणे करत राहून जास्त पुढचा
विचार न करता फक्त वर्तमानात राहून आपले कार्य अविरत चालू ठेवणे खूप
अवघड असूनही तू ते सध्या केलेस त्याबद्दल ...

आणि एव्हडे सारे असताना जिथे राजकारणी अथवा अधिकारी किंवा गुंडांच्या कृपेने
रोज अनेकानेक अनधिकृत बिल्डींग उभ्या राहतायत त्या आपल्या मुंबईत
तुझ्या घरत फक्त तुझ्या व्यायामा साठी तुला तू २५० स्क्वे . फु. एफ एस आय
रीतसर अर्ज द्वारे वाढवून मागितला तिथे त्यांनीच तुला शक्य नाही असे लेखी उत्तर दिले
आता हेच तुझ्या नावाने स्टेडीयम उभारतील...संग्रहालय उभातील
स्वताची कोनशीला बसवतील आणि फोटो हि काढतील...धन्य आहे तुझ्या निराभिमानी तरीही शांत लढवैयेगीरीची ...

असो...तू तसाच निर्मळ...निर्विकार राहून आपल्या कार्यात मग्न होणार

आता हेच बघ ना...

जेव्हा तू देशासाठी क्रिकेट खेळायला लागलास तेव्हा 

तुझ्या बरोबर आता खेळणार्यांमधील ...

मुरली विजय हा ५ वर्षे २२८ दिवसांचा होता...
ओझा ३ वर्षे ७१ दैवासांचा होता..
रैना २ वर्षे ३५३ दिवसांचा होता...
आणि...
पुजारा हा फक्त १ वर्ष ९ महिन्याचा होता....

आणि तरीही तुझे अथक प्रयत्न न थकता
न कंटाळता, न चिडता अथवा वैतागता
प्रामणिक पणे अव्याहत चालूच आहेत नियमितपणे...

काय म्हणावे तुला...

आणि अजूनही तू तुझी फेवारीत डिश मध्ये वडा पाव चा न चुकता उल्लेख करतोस...
इथेच तर आम्ही जान ओवाळून टाकतो तुझ्यावर....

सहस्त्र १८ करुनी धावा मी चाकर रसिकांचा
भोगी म्हणोनी उपहासाते योगी कर्माचा...

अशीच तुझीही अवस्था !

तुझ्या वाढदिवसा बद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन...

आणि तुझाखेळ असाच बहरत राहो व
सर्वाना हा आनंद सतत स्फूर्ती देत राहो हीच मनोकामना, शुभेच्छा
व देवा जवळ पार्थना...

मन:पूर्वक धन्यवाद,

तुझा एक निस्सीम चाहता,



अमर !



_________________________________________________________________________


वडील गेल्यावर त्याला आईबरोबर, घरच्यांबरोबर काही दिवस काढावेत असे नक्की वाटले असणार, परंतु कर्तव्य त्याने मोठे मानले. सत्यसाईबाबा गेले त्याच रात्री तो आयपीएल खेळला. दिवसभर काही खाल्लेले नसतानाही तो मैदानात उतरला. इथे सचिनने 'सत्यसाईबाबां'चे भक्त असावे की नसावे हा मुद्दा चर्चेचा ठरला. पण त्याने जवळच्या माणसाच्या वियोगाचे दुःख विसरून कर्तव्य महत्त्वाचे मानले, हे आपण सोयीस्कररित्या विसरलो....


FROM:

सचिनचे 'अश्रू' समजून घ्या!

___________________________________________________


Website for Answering the critics of the master of cricket Sachin Tendulkar


http://www.sachinandcritics.com/


_________________________________________________

No comments:

Post a Comment