Saturday, 30 April 2011

डोळ्यात तुमच्या आभाळ असेल तर...


डोळ्यात तुमच्या आभाळ असेल तर...
पंखाना कोणी बांधू शकणार नाही !

मनात तुमच्या ज्योत असेल तर...
कुठलाही अंधकार रोखू ना शके तुम्हा !

अंगात तुमच्या रग असले तर...
मृत्यूही थांबवणार तुम्ही !  

हृदयात तुमच्या स्वप्ने असतील तर...
कुठलीही क्षितिजे तुम्हा तोकडी नाही कधीही !

फक्त भ्रष्टाचाराचा एडस खोकला करेल तुम्हा...
त्यास लाथ मारुनिया जय महाराष्ट्र म्हणाया शिका !

उगा बहकू नका कोणीही खेळणे कोणाचे बनू नका ...
या तेजाचे बलिदान नको तर आता हवी समर्पित जागरुकता !

हेची विनवे आपला अमर आपणास... 
विनम्र अधिकारे मनापासुनिया सर्वास आनंदी ठेवा !

अमर घाटपांडे 

No comments:

Post a Comment