खाते, पिते, उघड्या नेत्री, जात माणसाची....
कारे उगा नावे ठेवता, आम्हा मांजरांशी !!!
कर्तुत्वाचे गाती पोवाडे, अन लगेच मागे फिरती....
आम्ही आडवे गेलो तर, आम्हाच नावे ठेवती !!!
अपचन होते तरी खाती, सोय सात पिढ्याची

मुले व्हावी म्हणुनी नवस, आणि मारती मुली पोटातच...
म्हणे आम्ही खातो गप्पकिनी, एक पिल्लू उगाचच !!!
वाघोबाची असले मावशी, तरी स्वकष्टे जगतो...

घाण केली आम्ही तरीही, लगेच झाकून टाकतो...
तुम्ही फिराता इकडे तिकडे, भिंती ओल्या करीत !!!
स्वच्छ करितो अंग आमचे, चाटून पुसून नित्य...
तुम्हीच वाया घालविता पाणी, बदा बदा सर्वत्र !!!
जात लई दांडगी तुमची, अविचारी कोडगी...

आपलाच अमर,
No comments:
Post a Comment