Saturday, 30 April 2011

जागतिक पुस्तक दिना निमित्त...


अक्षर ओळख झाल्या पासून...मला वाचायची खूप आवड निर्माण झाली...

मी वेगवेगळ्या गोष्टी...कविता...वेगवेगळ्या व्यक्ती रेखांमध्ये रमायला लागलो...

माझ्यावर माझ्या नकळत अनेक संस्कार रुजायला लागले...

मी बहरायला लागलो...मी मला विसरायला लागलो...

इतका...कि लोक माझ्या बद्दल तक्रार करायला लागले...

म्हणे हा पुस्तकात गेला कि याच्या शेजारी एखादा खुन झाला तरी याला कळणार नाही...

इतके वेड चांगला का? असा प्रश्न हे माझ्या आईला विचारू लागले...

मग मी वाचनालये...बागा...मित्राचे मोठाल्या वाड्यातील काही शांत कप्पे...

ऐतिहासिक स्थळे...हिरवळी...झाडाच्या सावल्या...अथवा फांद्या....

अश्या कुठे कुठे...माझ्या वाचनाचे देव्हारे निर्माण केले...

त्यातून वेगवेगळी जगे...वेगवेगळी माणसे...वेगवेगळी स्थळे...

वेगवेगळे  विचार आणि क्षितिजे...मला दिसू लागली...

माझ्याशी संवाद साधू लागली...

त्यातूनच वाचन नंतर मनन आणि चिन्तन किती महत्वाचे
हे जाणू, उमगू आणि समजू लागले....

त्यानंतर संवाद...चर्चा...वाद घडू लागले...
पण मग...येताजाता...रध्द्दी ची दुकाने हि खुणाऊ लागली...

त्यात तर खूपच धन गवसू लागले...

नन्तर तर भेळ, चणे, फुटाणे, दाणे...खाल्ले तरी सहजच पुरुचुन्डीतील मजकूर वाचू लागलो...
त्यात किराणा सामांनाच्या पुड्यांची हि भर पडू लागली आणि या सर्वात...

अद्यात्म...फिलोसोफी ...इतिहास...काव्य...शास्त्र...वैचारिक...व्यावहारिक...विश्लेषणात्मक
प्रवास... अशी अनेक रत्ने गवसू लागली....

त्याचा साठा वाढू लागला...

मग वाटायला लागले...हे सर्व पुस्तकात येते कुठून?....

त्यातून कळले...हे सर्व माणसातच असते...त्याचे मन अथांग आहे...

त्याच्या जाणीवा समृध्द आहेत....त्याला अनेक अदृश्य पंख आहेत...

पण गेल्या ५ / १० वर्षात...यात हळू हळू फरक पडायला लागला

व्यस्त जीवनमान...आणि उथळ लेखन...त्यामुळे त्या पासून मी दूर जायला लागलो...

ज्या पुस्तकांनी मला माणसे आणि निसर्ग वाचायला शिकवला...

तीच माणसे आणि निसर्गही बदलयला लागला...

पुस्तकांमधील पुस्तकपण हरवायला लागले कि काय अशी भीती वाटायला लागली...

पण तेवड्यात...इंटर्नेट आले... आणि जादूची छडीच फिरली जणू...

आधी होती त्याच्या कैक पटीने अनेक समृद्ध दालने उपलब्ध झाली...

अनेकानेक...नवनवीन विचार...पुस्तके...निसर्ग दालने आणि माणसे...

समोर उभी ठाकायाला लागली...त्यानंतर...आले हे फेसबुक....

त्याने तर सर्व विश्वच बदलले...अनेकानेक अंतरागे व्यक्त व्हायला लागली...


ज्ञानोबाचे पसायदान खरे व्हायला लागले....

दुरितांचे तिमिर जायला लागले...
खळांची व्यंकटी सांडायला लागली...
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो लागला...
आणि जो जे वंचील तो ते प्राप्त हि करू लागला...

आजच्या जागतिक पुस्तक दिना निमित्त...

माझे जीवन सतत समृद्ध आणि आनंदी ठेवणाऱ्या
तुम्हा सर्वांना आणि या फेस्बुक्माधल्या किड्याना
माझा मनःपूर्वक धन्यवाद...आणि सुभेच्छा...
आपण असेच व्यक्त होत राहा...
मी आपला आभारी आहे !

धन्यवाद,

आपला अमर...

No comments:

Post a Comment